थोडक्यात, या संगणकीय महाजंजाळात आता मराठीनेही आपला ठसा उमटवायला सुरुवात केली आहे!
स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन!
अवकाशवेध व ट्रेकक्षितीज ही संकेतस्थळे या आधीही बघितली होती. अवकाशवेध सारखे संकेतस्थळ मराठीमध्ये आहे याचे कौतुक आहे. माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ते चांगले संकेतस्थळ आहे. ट्रेकक्षितीजची मांडणी चांगली आहे. पण ते संपूर्ण मराठीमध्ये नाही. तरुणाई हे संकेतस्थळ मी प्रथमच ऐकले. पण ते पाहता आले नाही... परत या असा संदेश तेथे झळकला!
पु. ल. देशपांडे हे तर सर्वांच्याच जिव्हाळ्याचे ठरावे असे संकेतस्थळ आहे... फारच सुरेख मांडणी आणि माहिती/चित्रे तेथे आहेत. माय कोल्हापुर सुद्धा प्रथमच ऐकले आणि हे देखिल पाहता आले नाही! काम चालू असल्याने ते संकेतस्थळ उपलब्ध झाले नाही. ( त्यामुळे या पारितोषिकांबद्दल संशयास वाव आहे... )
असो...
मनोगत आणि अवकाशवेधची तुलना करता येणार नाही. जर केवळ मराठी कट्ट्यांची संकेतस्थळे घेतली तर त्यात मनोगत सर्वात उत्तम ठरेल यात शंका नाही! मराठीत युनिकोडचा वापर, अद्ययावत व सोपे टंकलेखन तंत्र तसेच शुद्धलेखन चिकित्सा या गोष्टी मला मनोगतवरच प्रथम सापडल्या. संपूर्ण मराठीचा आग्रह ही तर मनोगतची खासियत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इथला ज्ञानाचा खजिना!
भारतीय नेटकर इंटरनेटवरती केवळ याचकच असतात असा माझा समज आत्ता आत्तापर्यंत होता. आताशा आपण ज्ञान निर्मितीदेखील करतो आहोत हे विशेष उल्लेखनीय.
महेश वेलणकरांचे द्वितीय पारितोषिकाबद्दल हार्दिक अभिनंदन!
शिवाय सर्व मनोगतींचे देखिल अभिनंदन!