शब्दांचा वापर, प्रयोग अचूक(चपखल ह्या अर्थाने) किंवा चूक असू शकतो. स्वतः शब्द घाणेरडे किंवा चांगले नसतात. असे माझे स्पष्ट मत आहे.
अगदी बरोबर!
टग्यांच्या वतीने मी बोलू शकत नाही... पण अंदाज करायचाच झाला तर त्यांचीही यांस सहमती असावी असेच वाटते.
सुंदर कल्पना, सुंदर उपमा, अतिशय 'अपीलिंग', स्पष्ट आणि मुख्य म्हणजे अतिशय स्वच्छ - विचार (अगदी उद्विग्नतासुद्धा) व्यक्त करताना घाणेरड्या शब्दप्रयोगांचा वापर करण्याची मुळीच गरज नाही, हे अधोरेखित करणारी कविता. मानले!
तरीही हे ही मान्यच!!
वरवर विरोधाभास वाटेल पण दोन्ही भूमिका एकाच वेळी तितक्याच खऱ्या आहेत.