कोंबडीदेवी नमस्कार,

तुमचे विचार खूपच प्रगल्भ वाटतात.

ज्या गोष्टी विनासायास मिळतात त्यांच्याविषयी अभिमान का वाटावा?
स्वकष्टार्जित गोष्टींबाबतच अभिमान वाटावयास हवा! असे आपले मत दिसते.

ह्यामुळे 'अभिमान' शब्दाच्या व्याख्येवरच प्रश्नचिन्ह लागलेले दिसत आहे.

मनुष्याचा जन्म मिळून ह्या साऱ्याचा विचार, विवाद आणि व्यवहार, मी विनासायास करू शकत आहे ह्याचा मला अभिमान आहे. अभिमान म्हणजे आवडीचाच एक भाग आहे. हे वरदादेवींचे म्हणणे खरे आहे.

कोंबडीदेवी तुम्हाला सर्वसामान्यपणे ज्या गोष्टींचा अभिमान असावा त्या गोष्टींचा अभिमान दिसत नाही? मग तुम्हाला अभिमान कशाचा वाटतो हे समजले तर कदाचित तुमचे अभिमानाचे वावडे समजून घेता येईल. तुम्हाला स्वाभिमान आहे का हो? तो कुठल्या स्वकष्टार्जित गोष्टींचा परिपाक आहे हे जाणून घ्यायला मला आवडेल!

आपल्या वैचारिक स्पष्टतेची खिल्ली उडविण्याचा हा प्रयत्न नसून त्या स्पष्टतेलाच आणखी अणुकुचिदार, धारधार आणि तेज करण्याचा हा एक प्रयत्न आहे.