हाहाचित्त आणि वात्रटराव,
लोकांना- "उपयोगी आणि नवीन माहिती" देणारं संकेतस्थळ असं अपेक्षित आहे. मराठी मधे खगोलशास्त्राची वा इतर कशाचीही. इतकी माहिती देणारं दुसरं संकेतस्थळ माझ्या पाहण्यात नाही. मनोगताच्या तांत्रिक सुविधा आणि एकंदर संकल्पनेबद्दल वादच नाही. पण "त्यापेक्षा आपलं मनोगत दसपट चांगलं आहे " आपला तो बाळ्यातलाच प्रकार झाला.
हा , हे पटतं की पुरस्कारप्राप्त संकेतस्थळांपैकी दोन नेटवरून गायब आहेत, तेव्हा शंकेला वाव आहे. पण केवळ आपण मनोगती आहोत म्हणून, त्यांच्यापेक्षा आपली साईट कितीतरी भारी होती म्हणणं म्हणजे अखिलाडूपणा आहे.
बाकी तुम्ही बघा....आपंण तर दोन्ही संकेतस्थळं मनापासून 'एंजॉय' करतोय !
जे पी