नरेंद्र म्हणतात त्याप्रमाणे मलाही या अत्यल्प प्रतिसादाबद्दल आश्चर्य वाटत होते. असो.
मला खरे तर अजून एक मुद्दा उपस्थित करायचा होता. थोडे प्रतिसाद आल्यावर चर्चा पुढे वाढवावी या विचारानी मी तो मांडला नव्हता. परंतु आता मांडतो :
वर हॅम्लेट यांनी म्हटलेच आहे, त्याप्रमाणे पाश्चिमात्य प्रगत देशांच्या तुलनेत आपल्या देशात सौर उर्जेची विपुलता आहे. पाश्चिमात्य प्रगत देश हे त्यांच्या देशात ही उर्जा अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने त्यावर फारसा भर देत नसावेत. अरब देशांकडून हडपलेलं तेल विकले गेल्याशिवाय अमेरिकाही त्याचा पाठपुरावा करेल असे वाटत नाही.
थोडक्यात आपणच यामध्ये संशोधन करणे गरजेचे आहे. सुदैवाने तसे प्रयत्न होत आहेत असे दिसते. परंतु सरकारने किंवा मोठ्या खासगी कंपन्यांनी मनावर घेतल्यासच त्यात योग्य ती प्रगती होवू शकेल.
सौरचुलीमध्ये काही सुधारणा करुन त्याही वापरण्यास सोप्या करणे शक्य आहे.
नुकतीच सकाळ मध्ये एक बातमी वाचली - "गुजराथ सरकारने एका गावाला सौर उर्जेवर वीज निर्मिती करण्यासाठी मोफत उपकरणे दिली. आता त्या गावात २४ तास वीज उपलब्ध असते." याच धर्तीवर महाराष्ट्रातील गावांतही वीज निर्मिती करता येईल. ज्या ठिकाणी वीज पोहोचवणे अवघड असते अश्या ठिकाणी याचा विशेष उपयोग होवू शकेल.