प्रस्तुत प्रकारात मिरी, मीठ आणि कोथिंबीर वापरलेली आहे, आणि तो टोमॅटो केचपबरोबर खाल्ला जात आहे.
फ्रेंच टोस्ट मध्ये कोथिंबीर वापरत नाहीत हे मान्य. (मी ही वापरत नाही) पण मिरी आणि मीठ जरूर वापरले जाते. 'काँटिनेंटल फूड्स' सदराखाली, कुणा युरोपिअन कुकच्या लिखित पाककृतीतून मी वाचले आहे. बाकी प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार, गरजेनुसार पाककृती बदलत असतो. पण ती पाककृती ज्या मूळ पाककृतीवर बेतलेली असते तिचा गाभा ओळखून मूळ पदार्थ ओळखता येतो.
आपल्याकडेही मालवणी चिकन, मटण, मासे ह्यांच्या विविध पाककृती आढळतात. त्या सर्वांना 'मालवणी' असेच नांव असते. हे फक्त उदाहरणा दाखल.