वरती माझे "काही विस्कळीत मुद्दे" वाचा.

काही काळा करता परदेशात वास्तव्य ठिक आहे. परदेशात रहावे, अनुभव घ्यावा, चार पैसे कमवावेत, अनुभव व पैसे भारतात घेउन यावे.

६ वषे अमेरीकेत राहुन हेच शिकलो!

उपासाच्या दिवशी चुकून बिस्कीट खाल्ल्यावर "उपासाला बिस्कीट चालतं" असं म्हटल्यासारखं आहे हे. आणि पैसे कमवूनच का बरं मग? डॉलर निम्म्यानं उतरला तरी जाल का मग भारतात?

कायम परदेशात वास्तव्य असल्यास, प्रत्येक अनिवासी भारतीयाने कतकमी ५ अनाथ मुलांना दत्तक घ्यावे.

कमीतकमी पाच? जास्त्तीत जास्त किती तेही सांगून टाका लगेहाथ!

परदेशात वास्तव्य व देश प्रेमाच्या गप्पा म्हणजे, पाण्याच्या बाहेर राहुन पोहणे शिकवणे आहे.

परदेशातच काय, देशात राहूनही नुसत्या गप्पा मारल्या तर त्याचा उपयोग आहे का? देशात राहून गप्पा मारण्यापेक्षा परदेशात राहून काहीबाही काम करता आलं तर तुमच्या त्या राष्ट्रीयत्वाला मुरड पडते काय?

जे मनोगत तुम्ही आम्ही फुकटचे वापरत आहोत तेही एका परदेशस्थाची निर्मिती आहे हे विसरू नका.

- कोंबडी