५० वर्षात किती पिढ्या तयार होतात हो? "साधारणपणे (average) २५व्या वर्षांनंतर माणूस प्रजोत्पादन करतो" असे गृहीत धरले तर फक्त दोनच पिढ्या तयार होतात. म्हणजे १९५० साली सर्वच "मागासवर्गीयांनी शिक्षणाचा लाभ घेतला तर १९७५ साली त्या सर्वांना नोकरीतील आरक्षणाचा लाभ घेता येईल" आणि त्यांची दुसरी पिढी २००० सालात नोकरीचा लाभ घेईल.

असहमत.
दर १० वर्षांनी एक नवीन पिढी तयार होते असे वाटते. म्हणूनच १० वर्षे किंवा त्याहून अधिक अंतर ज्यांच्या वयात असते त्यांच्यात वैचारिक तफावत आढळते आणि त्यालाच 'जनरेशन गॅप' म्हणतात असे वाटते.

आता आरक्षणावरून जो गदारोळ चाललाय तो काही नवा नाही मागील २०-२५ वर्षांपासून चालू आहे. म्हणजे फक्त एका पिढीला आरक्षण मिळाल्यानंतर.

असहमत.
एका कुटुंबाचा विचार केला २५ वर्षांत एका पिढीने फायदा घेतला असे होते. पण 'जनरेशन गॅप'च्या हिशोबाने समस्त मागासवर्गीय समाजाचा (ज्यांना घटना मागास म्हणते) विचार केला असता २५ वर्षात किमान २.५ पिढ्यांनी (आणि ६० वर्षात किमान ६ पिढ्यांनी) या सवलतींचा फायदा घेतला आहे.