क्या ही रिज्वॉं से लडायी होगी
घर तेरा खुल्द मे गर याद आया।

इथे रिज्वाँ म्हणजे स्वर्गाचा रखवालदार, चित्रगुप्त म्हणा हवं तर, खुल्त म्हणजे अर्थातच स्वर्ग. (आठवा खुल्ताबाद)

तू स्वर्गातच असशील, हे जेंव्हा लक्षात आले त्यानंतर चित्रगुप्ताशी भांडायचे कारणच काय?

प्रियकर मेल्या नंतर स्वर्गात जाण्याच्या वाटेवर असून प्रियेच्या वियोगाने त्याला स्वर्ग ही नकोसा झाला आहे. ती तिथे नसेल तर त्याची स्वर्गातही जाण्याची तयारी नाही व यासाठी त्याला स्वर्गात धाडू पाहणाऱ्या चित्रगुप्ताशी तो भांडत आहे असे चित्रण उभे केले आहे. प्रियव्यक्तिच्या वियोगात स्वर्गही नकोसा वाटणे, त्यासाठी चित्रगुप्ताशी भांडण, नंतर आपलीच चूक लक्षात येणे सारेच ग़ालिबाना. म्हणूनच सुरेख!