कोंबडीदेवी, तुमचे उत्तर आवडले.

तुम्हाला अभिमानाचे वावडे नाही, दुराभिमान नाही हे वाचून आनंद झाला.

तुम्हाला स्वाभिमान आहे. विचार करता येण्याचा अभिमान आहे. हेही उत्तमच.
इथे हे नमूद करायला हवे की ही गोष्ट स्वकष्टाचाच परिपाक आहे असे नाही.

यावरून अभिमान, स्वाभिमान, दुराभिमान, वृथा अभिमान आणि गर्व (गर्व से कहो)
यांच्याबाबतच्या तुमच्या व्याख्या जाणून घ्यायला आवडेल. कारण,
प्रस्थापित व्याख्या तुम्हाला मंजूर नाहीत.

असो. तुम्ही जसा वस्तुनिष्ठ विचार करत आहात. तसा प्रत्येकालाच, प्रत्येकवेळी करता येत नाही म्हणूनच मानवी आयुष्याचे वर्णन 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' असे करावे लागते. काय म्हणता?