कोंबडीताई -
माझ्या मते जे वैविध्य दिसतं आहे त्यात माणसांच्या मूलभूत प्रवृत्तींपेक्षा अभिमानाची नेमकी व्याख्या त्या क्षणी कशी केली जाते यांमुळे अधिक असावे.
सर्वसाधारणपणे सुसंस्कृत माणूस हा कौतुक/आनंद या अभिमानाच्या भावंडांना अंगाखांद्यांवर नाचवितो; तर त्याच्या दुराभिमान या अवताराला पायदळी तुडवितो.
... अर्थात आधीच सांगितल्याप्रमाणे येथे दिलेली माझी ही फक्त प्रामाणिक अटकळ... नेमके या मंडळींच्या किंवा इतरही बहुतेकांच्या मनात नेमके काय आहे हे सांगण्याचा अधिकार नाहीच.