कोंबडीताई,

तुम्ही असे ठामपणे म्हणू शकता का की तुम्हाला मिळालेली उत्तरे अगदी १००% खरी आहेत ? जात/वंश/धर्म याबाबत बरेच जण सार्वजनिक रित्या कुठलेही मत व्यक्त करताना थोडीशी सावध भूमिका घेतात.

शिवाय माझे असे मत आहे 'कुठल्या' गोष्टीचा अभिमान नसणारे लोक कदाचित 'आयडेंटिटी क्रायसिस' मधून जात असावेत किंवा खालीलप्रमाणे असावे.

माझा दुसरा प्रश्न असा की बरेच लोक धर्म बदलून घेतात. किंवा मातृभाषा सोडून दुसरी भाषा वापरतात. आणि त्यांच्यासाठी  'पर' धर्म/भाषा /देश 'स्व' धर्म/भाषा/देश असतात. त्यामुळे अशा लोकांना जरी जन्माधिष्ठित धर्माचा/भाषेचा/देशाचा/जातीचा अभिमान नसला तरी दुसऱ्या धर्माचा/भाषेचा/देशाचा/जातीचा अभिमान असू शकतो. त्यामुळे वरील उत्तरे दिशाभूल करणारी आहेत असे वाटते.

माझ्यापुरते बोलायचे झाल्यास मला माझ्या जन्माधिष्ठित जात,धर्म,देश,मातृभाषा या सर्वांचा अभिमान आहे.