हा ज्याचात्याचा वैयक्तिक आणि व्यक्तिगत प्रश्न आहे, ज्याचं उत्तर त्या व्यक्तीने सर्व गोष्टींचा सारासार विचार करून घेणे अपेक्षित असते.

मला स्वतःला कायमचे परदेशात रहायला अजिबात आवडणार नाही, पण कामानिमित्ताने किंवा सहज फिरायला म्हणून मात्र मी ( एकटी / सपती (सपत्नी तसं सपती.. ;-) ) / सहकुटुंब ) नक्कीच निरनिराळ्या देशांमध्ये राहून, मनसोक्त भटकंती करून तिथल्या लोकांच्या मायेची, आपुलकीची अक्षय आणि अलोट संपत्ती जमा करून घेऊन येणार आहे.

संस्कृती, भावना, विचार ह्या गुणांना स्थलकालाची बंधने कधीच नसतात असे मला वाटते.