गदिमांच्या जोगिया कवितेतील पहिल्या काही ओळी पाहा

कोन्यात झोपली सतार, सरला रंग
पसरली पैंजणे सैल टाकूनी अंग.
दुमडला गालिचा तक्के झुकले खाली
तबकात राहिले देठ लवंगा साली.
झुंबरी निळ्या दीपात ताठली वीज
का तुला कंचनी अजूनी नाही नीज. ....

शब्दांची अचूक निवड आणी डोळ्यांसमोर चित्र उभे करणारे प्रसंगवर्णन इथे (आणि गदिमांच्या सर्वच काव्यात) दिसून येते.

 पैंजणांचे सैल पणे अंग पसरणे कसे अगदी आळसावलेले वातावरण तयार करते.

 

-भाऊ