मला वाटत आपण जसं बघाव तसं जग दिसतं.

मी परदेशात राहून तिथल्या माणसांची कसल्याही प्रकारे मायेची, आपुलकीची संपत्ती गोळा केलेली नाही. ऐहिक सुखांची संपत्ती नक्कीच गोळा केली पण स्वकष्टांवर केली, त्यातली बरीच आपल्या देशातही पाठवली.

माझ्या हजेरी/गैरहजेरीने माझ्या देशाला फार मोठे फायदा/ नुकसान होईल असे काही मी पूर्वी केलेले नाही आणि यानंतरही करणाऱ आहे अशातला भाग नाही. (उदा. समाजसेवा, सैन्यभरती इ.) इतकी लोकं परदेशी जाऊनही भारताची गेल्या काही वर्षांत झपाट्याने सामाजिक आणि आर्थिक उन्नतीच झाली आहे तेव्हा व्यर्थ टाहो का बरं फोडतात हे लोक?

आपल्याला परदेशात कायम रहायला अजिबात आवडणार नाही असा धोशा लावणाऱ्या व्यक्ती आपल्या मुलांना फुकट परदेशी नागरिकत्व मिळेल म्हणून कठीण परिस्थितीत, परवडत नसतानाही इथे आल्या आल्या जन्माला घालतात. (हा मुद्दा अतिशयोक्ती वाटेल परंतु बऱ्याच वेळा अनुभवलेला आहे)

भारतात राहून मनाने (आणि शरीरानेही)  परदेशी झालेले अनेक लोक पाहिले आहेत. उदा. अमिताभ बच्चन.

माझ्या स्वतःच्या बाबतीत बोलायच झाल तर मला परदेशात कायम वास्तव्य करायला आवडेल अस नाही म्हटल तरी चालेल. कारण साध सरळ आहे--

१. जिथे रहाते तिथली सवय झाली आहे. घर केलं आहे तेव्हा परत येण्याचा विचार सोडून दिला आहे.

२. हा प्रश्न माझा एकटीचा नसून संपूर्ण कुटूंबाचा आहे. मुलांना कदाचित भारतात परदेशी वाटेल असं वाटतं तेव्हा त्यांच्यावर जबरदस्ती का करा?

३. मुंबईला परत गेल्यावर आता तिच परदेशी भासते. रस्ते, पत्ते, इमारती, रहाणीमान, लोक सर्वच बदलून गेलं आहे. मुंबई झपाट्याने बदलणारं शहर आहे या बाबत मला वाटत कोणाचच दुमत नसावं. (येथेही अतिशयोक्ती नाही)

४. इथे राहूनही स्वत्व जपलं आहे. तेव्हा याचा अर्थ "गद्दारी" वगैरे कसा होतो ते माहित नाही.