याच अर्थाची 'नवा शिपाई' नावाची कविता आठवते का?

नव्या मनूतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहे
कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे।

ब्राह्मण नाही हिंदुही नाही न मी एक पंथाचा
तेच पतित की जे आखडती प्रदेश साकल्याचा
खादाड असे माझी भूक
चतकोराने मला न सूख
कूपातिल मी नच मंडूक
मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे।

जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत
सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत
कोठेही जा पायांखाली तृणावृता भू दिसते
कोठेही जा डोईवर ते दिसते नीलांबर ते
सावलीत गोजिरी मुले
उन्हात दिसती गोड फुले
बघता मन हर्षून डुले 
ती माझी मी त्यांचा एकच ओघ आम्हातून वाहे ।

(आणखीही काही ओळी आसाव्यात असे वाटते. कोणाला आठवल्यास सांगाव्यात.)

ही वसंत बापटांची अतिशय सुंदर कविता आहे. पुन्हा यातही 'मी हिंदू नाही' म्हणायचा आत्मघतकी प्रकार दिसतो. 'मी हिंदू नाही' असे केवळ हिंदूच म्हणू शकतो. कोणताही मुस्लिम 'मी मुस्लिम नाही' अथवा कोणताही ख्रिश्चन 'मी ख्रिश्चन नाही' असे म्हणणार नाही ही बापटांची आणि आपल्या काँग्रेस सेवादलाची शोकांतिका आहे. परंतु तरीही कोणत्याही हिंदूच्या मनात नैसर्गिकपणे असलेली सर्वसमावेशक भावना ह्या कवितेत अत्यंत समर्थपणे व्यक्त झाली आहे हे मात्र खरे. 

आपला
(हिंदू) प्रवासी