भारतातून परदेशात जाणे आणि खेड्यातून भारतातील शहरांकडे जाणे यांची उदाहरणे दिलेली दिसत आहेत. या दोन्हीमध्ये उघडपणे काही साम्य आहेच. हे बहुतेकांना अगदी पटलेले दिसते आहे. त्यामुळे त्याविषयी अधिक लिहीत नाही.

या तुलनेतील फरकही खूप मोठा आहे - त्याचा उल्लेख दिसत नाही... काही कारणे अशी...

(१) कर कोणांस जातो?
(२) शिक्षण --  विशेषतः आय-आय-टी सारख्या सरकारी अनुदानावर पोसलेल्या संस्थेमधून झाले असल्यास -- कोणी पुरविले आणि लाभ कोण घेत आहे?
(३) बुद्धिमत्तेचा, क्षमतेचा फायदा कोणत्या समाजास मिळतो?
(४) पुढील पिढी भारतासाठी पूर्णपणे परदेशी होते. (भावनिक पातळीवरील मुद्दे येथे टाळलेले आहेत. पुढील पिढी परदेशी होते हे म्हणण्यामागे ह्या प्रचंड क्षमता असलेल्या पुढील पिढीचा कोणत्या समाजास लाभ होत राहणार इतकाच मुद्दा आहे.)
...
...
------------------------------------------------------------

तसेच या तुलनेतील फरकाची भावनिक/सांस्कृतिक/कौटुंबिक/वैयक्तिक कारणे ही पूर्णतः वेगळ्या पातळीवर आहेत. त्याला बरेच आयामही आहेत. काळे-पांढरे उत्तर मिळणार नाही.
------------------------------------------------------------

जे परत येत नाहीत त्यांना गद्दार म्हणणे पूर्णतः चूक आहे. माझ्या इतर प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे कोठेही राहिले तरी शेवटी आयुष्यात काही सत्कृत्य केले किंवा नाही हे अधिक महत्वाचे. NRI चे माहीत नाही पण RNI नक्कीच धोकादायक!
त्याचबरोबर जो याला गद्दारी असे म्हणतो त्याच्या मनांत वर दिलेली अशी कारणे कोठेतरी असतात. कोणी हिशेब करायला येत नाही, पण भारतातून किती घेतले आणि भारताला किती दिले याचा स्वतःशीच पडताळा मांडायला कधीतरी हरकत नसावी. मनोगतकार परदेशस्थ आहेत असा उल्लेख आढळतो. त्यांनी जे भारतीयांना दिले अगदी तितके नसेल पण किमान त्या दिशेने परदेशी स्थायिक होणाऱ्यांनी काहीतरी परत दिले पाहिजे तरच गद्दारीचा -- विनाकारण लागलेला म्हणू या -- कलंक पुसता येईल.
------------------------------------------------------------

तसेच बऱ्याच परदेशी स्थायिक होणाऱ्यांची भारतीयांना उगाच नावे ठेवण्याची वृत्तीही तिरस्कार निर्माण होण्यास कारणीभूत राहते. (वाचा रोहिणीताईंचा प्रतिसाद!)