(२०/०५/२००६)
लिखाण ठीक आहे, पण,
लिखाणाचा फॉर्म एकसारखा नाही. कधी रोमान्स कधी प्रणय, कधी ग्रॅज्युएशन कधी पदव्योत्सव(?), कधी "फुल्ल व्हॉल्युमवरचे म्युझिक" कधी "मेहनतपूर्वक विकसित केलेली कला" ह्यामुळे कधी स्पीडब्रेकरवरून आणि कधी खड्यातून गेल्यासारखे वाटले.
जास्त इंटेंसिटी आणण्यासाठी केलेल्या शब्दरचना कृत्रिम वाटतात. "लटक्या रागाने फुरंगटून जाऊन", "मैत्रीच्या या विणेत आयुष्यभराच्या कायमच्या सोबतीचे टाके घातले." इ. इ.
बाकी कथेचा विषय आणि मांडणी दोन्हीही महाविद्यालयीन/पौगंडावस्थेतील मुलामुलींना आवडण्यासारखे आहे.
"तुम्ही 'अचाट' लिहिता" या आगाऊरावांच्या निरीक्षणाशी सहमत आहे.
प्रामाणिक मत, राग नसावा.
(३०/०५/२००६)
ता. क. - हे मत या लिखाणाबद्दल आहे, लेखकाबद्दल नाही.