माणसाला स्थलांतर करायला दोन गोष्टी कारणीभूत असतात.पहिली म्हणजे निकड.उदा.केरळातून अनेक मुस्लिम इराण इराक सौदी अरबस्तान इ.ठिकाणी जाऊ लागले त्याला खूप वर्षे झाली.दाक्षिणात्य लोक मुंबईत बऱ्याच प्रमाणात आले.आता बिहारी भय्ये मुंबईत गर्दी करत आहेत,त्यांच्यातीलच ज्याना जमले ते अमेरिकेतही आले त्यामुळे अमेरिकेतही ती मंडळी जास्तच आहेत‌. सूर्यनारायण राव सारखा माणूस धोका पत्करून अफ़गाणिस्तानात गेला.आपल्या प्रांतात वा देशात उदरभरण करणे  शक्यच नसल्याने झालेली ही स्थलांतरे आहेत.काही जण आपल्या प्रांतात वा देशात मिळेल त्यातच आम्हास हेच बरे वाटते असे म्हणतात आणि मग त्याना खरेच तेच बरे वाटू लागते.काही धाडसी लोक चांगली नोकरी सोडून अधिक चांगली परिस्थिती प्राप्त व्हावी म्हणून बरेच कष्ट सोसून परदेशी जातात.त्यांच्या धाडसाबद्दल त्यांचे कौतुक करण्याऐवजी त्याना नावे ठेवणे योग्य नव्हे.आपल्या कूपमंडूक वृत्तीने आपल्या मागील पिढीने स्वतःचे आणि पर्यायाने पुढच्याही पिढीचे थोडेफार नुकसानच केले तेव्हा त्याना आणखी पुढे जायला प्रोत्साहन देऊ या.त्यांचे पाय मागे खेचणे योग्य नव्हे.देशासाठी काही करावेसे ज्याला वाटते तो कोठेही राहिला तरी करणारच.बाबू अरविंदांना पूर्णपणे इंग्रज बनवण्याचे त्यांच्या पिताजींच्या मनात होते पण विधिलिखित वेगळेच होते.तेव्हा येथे राहूनही भारताची शान वाढविणाऱ्या बॉबी जिन्दाल,कल्पना चावला अशा  भारतियांचा आदर्श ते आणि समजा ते येथेच राहिले तर त्यांची पुढली पिढी ठेवेल अशी आशा करू या. सदैव माणसा पुढेच जायचे हीच वृती हवी