देशातील सध्याची परिस्थिती पाहिली तर परदेशात कायम चे वास्तव्य करणे योग्यच आहे असे मला वाटते. आधारास्तव मी येथे भोमेकाकांच्या 'आरक्षण असावे काय' या चर्चासत्रासाठी लिहिलेल्या प्रतिसादातील एक परिच्छेद येथे देत आहे -

सदर लोक देशाबाहेर जाऊन रोजी रोटी कमावतात, देशातल्या नोकऱ्यांमधली स्पर्धा कमी करतात, परदेशी चलन पाठवतात. त्यांच्याबद्दल देशवासीयांमध्ये इतका राग का धुमसत असतो ते समजत नाही.

फ्री सीट मिळवण्याची गुणवत्ता असतानाही आरक्षणामुळे पेमेंट सीट घ्यावी लागते तिथेच या पद्धतीचे मूळ आहे असे वाटते.

ज्यांना घटना सवर्ण म्हणते त्यांना आजकाल देशात बहुतांशी ठिकाणी दुय्यम दर्जाची वागणूक मिळते असे वाटते. त्यांची गुणवत्ता, अनुभव आणि बुद्धिमत्ता विचारात न घेता त्यांची जात बघितली जाते. सर्व सरकारी आणि अनुदानित संस्थांमध्ये ज्येष्ठता आणि अनुभवाचे निकष डावलून राखीव जागांतले उमेदवार बढती मिळवताना दिसतात.

त्यामुळे सरकारी आणि अनुदानित संस्थांत जावे तर सवर्णांना (ज्यांना घटना सवर्ण म्हणते) फक्त अपमान आणि चडफड मिळते. राहता राहिले खाजगी क्षेत्र त्यातसुद्धा मतांचे राजकारण करणारे सत्तांध राजकारणी आरक्षण आणू पाहत आहेत.

घटना ज्यांना सवर्ण म्हणते त्यांना जातनिरपेक्ष आयुष्य जगायचे असेल तर त्यांनी आपल्याच देशात जावे कुठे? मग अश्या परिस्थितीत परदेशाची वाट धरली तर बिघडले कुठे?

जगावर कातडे ओढता येत नाही, आपल्या पायात चपला घालायच्या असतात...याच्याइतकेच हे सरळ आहे.

कायमचे वास्तव्यतर फारच उत्तम!!