वंदे मातरम हे गीत बंकीमचन्द्र यांनी १८७५ च्या सुमारास लिहिले. त्यानंतर ७-८ वर्षांनी लिहिलेल्या आनंदमठ या स्वतःच्याच कादंबरीत ते समाविष्ट केले.
आनंदमठ ही कादंबरी मुख्यत्वे जुलमी मुस्लीम राजवटीविरुद्ध साधू-संन्यास्यांनी दिलेल्या धार्मिक (राजकीय नव्हे) लढ्याच्या पार्श्वभूमीवर आधारीत आहे.
पुढे १९०५ साली लॉर्ड कर्झन याने बंगाल प्रांताची धार्मिक फाळणी करण्याचे जाहीर केले. याला हिंदू समाजाने विरोध केला. हिंदू समाजाला फाळणी विरोधात एकत्र आणण्यासाठी वंदे मातरम या गीताचा/घोषणेचा मोठाच उपयोग झाला. मुस्लीम समाज हा फाळणीच्या बाजूने होता. त्याने वंदे मातरम ला हिंदू राष्ट्रवादाचे प्रतीक मानून विरोध केला.
त्यानंतर भगतसिंगादी अनेक स्वातंत्र्ययोध्यांनी वंदे मातरम ला संकुचित अश्या हिंदू राष्ट्रवादातून बाहेर काठून अधिक प्रगल्भ असे परिमाण दिले. परंतु कोत्या मुस्लिम नेत्यांनी ना कधी हे समजून घेतले ना आपल्या समाजाला समजू दिले.
स्वातंत्र्यानंतर मतपेढीवर डोळा ठेऊन काँग्रेसनेही या गीताची उपेक्षाच केली.
स्वातंत्र्ययोध्यांनी अजरामर केलेल्या ह्या गीताचा उपयोग आता केवळ मुस्लीमाना झोडपण्याचे आणखी एक साधन एव्हढाच काही मंडळी करीत आहेत.