अभिजित,
हे 'अभूतपूर्व' लिखाण आवडले! भूतकाळात भूताची इतकी इथंभ्भूत मुलाखत वाचनात आली नव्हती.पी.एच.डी च काय एखाद्या निरक्षर भूताचीही दुर्दैवाने (की सुदैवाने..) भेट घडली नव्हती.आयुष्यात परा'भूत' होण्याचेच प्रसंग मात्र खूप आले!
एका नवीन साहित्य-प्रकाराची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
या क्षेत्रातील इतर मंडळी (उदाः झंखिण,डाकीण,चेटकीण,पांढऱ्या साडीतील मुक्तकेशा रूपवती) आदींच्याही  मुलाखती वाचायला मिळतील काय? तसेच 'जेंडर बायस' चा आरोप येऊ नये म्हणून एखाद्या 'म्हसोबाची' मुलाखतही घ्यावी.बारा पिंपळावर राहिलेला एखादा अनुभवी, पर्यटक मुंजाही शोधावा!

(जयन्ता५२)