'दिल चाहता है' या आजच्या पिढीच्या चित्रपटात आपल्याहून वयाने मोठ्या असलेल्या, घटस्फोटित, अल्कोहोलिक डिंपलच्या प्रेमात पडून तिच्याशी लग्नाचा विचार करणाऱ्या नायकाला डिंपल चिडून म्हणते, ' तुम्हारे जनरेशन की यही प्रॉब्लेम हैं. तुम्हे लगता हैं की सबकुछ चलता हैं'....
मी ज्या पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना शिकवतो, त्यातल्या नव्वद टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना साहिर लुधियानवी, मुन्शी प्रेमचंद, ना. सि. फडके, मदनमोहन, पी. जी. वुडहाऊस हे कोण लोक आहेत हे माहिती नाही.......
सलमान खानला चिंकारा प्रकरणात शिक्षा झाल्यावर त्याने काही हरणं मारली ( आणि नशेत धिंगाणा घातला, बेजबाबदारपणे गाडी चालवून लोकांना चिरडलं...) म्हणून काय झालं, ही लुक्स सो क्यूट ना (?) .... अशी माझ्या बऱ्याचशा विद्यार्थिनींची प्रतिक्रिया होती ......
कॉलेजमध्ये तुम्ही कशासाठी येता असं विचारल्यावर एकदोघांनी ' टू चिल आऊट..' असं उत्तर दिलं.....
तेंव्हा हिमेश रेशमिया ऐकणाऱ्यांना ऐकू द्या. त्यांचे प्रबोधन करण्याच्या भानगडीत पडू नका. आपल्याकडं आपले रफी, किशोरकुमार, हेमंतकुमार, तलत आहेत ( विषय पुरुष सिनेगायकांचा चाललाय म्हणून इतर नावे लिहीत नाही...) तोवर आपल्याला चिंता करण्याची गरज नाही....
सन्जोप राव