मनोगताच्या या यशाबदल प्रशासक त्रयीचे आणि ही दिंडी पुढे नेत राहणाऱ्या मनोगतींचे मनापासून अभिनंदन.
मनोगत मनातल्या अनेक अस्पर्श्य कोपऱ्यांना स्पर्शून जातं त्यामुळे आता ते मनामनांतील मर्मबंधातली ठेव बनलं आहे. त्या लाडक्या  मनोगताचा हा सन्मान आणि त्याला पुरस्काराने मिळालेली लोकमान्यता पाहून हर्षाने काळीज सुपाएवढं झालं आहे. मनोगताच्या वैश्विक कुटुंबाचं हे यश निश्चित अभिमानास्पद आहे. आणि सर्व जगातून मनोगती या आनंदात समरस झाले आहेत यात शंकाच नाही.
महेश वेलणकरांनी हे "इवलेसे रोप" लावून त्याला कष्टाचं जे खतपाणी घातलं आहे त्यामुळे त्याला आलेल्या या मधुर फळाबदल त्यांचे विशेष आभार आणि अगदी मनापासून अभिनंदन....

--अदिती