माफी नका मागू हो वेदश्री. आपण दोन बायकांनी या पुरुषावर (तुम्हाला मी त्याला प्राणी म्हंटलेलं आवडल नसेल तर) वाद घालावा एवढीही त्याची लायकी नाही. (हलकेच घ्या).

बाकी माझी हिंमत नाही रेडिओवर त्याची गाणी ऐकायची, ती इथे लागतही नाहीत हे माझ भाग्य. १९९८ सालापासून या माणसाची किती गाणी प्रसिद्ध आहेत, किती आघाडीच्या निर्मात्या/ दिग्दर्शकांनी त्यांना संधी दिली आहे, त्याच सध्याच कुठल गाण तुमच्या तोंडात खेळत आहे आणि ते किती दिवस खेळेल, ते रिमिक्स आहे का, या माणसाची प्रतिभा काय या बद्दल अधिक माहिती लिहून मी वेळ वाया घालवण्या पेक्षा (IMDB) वर किंवा इतर ठिकाणी तुम्ही शोध घ्या.

गेल्या १० वर्षांत मला या माणसाच कुठलही गाण आवडल नाही. प्रत्येक वेळी ते पुढे ढकालाव हिच इच्छा होते. त्याच पूर्ण गाण ऐकण म्हणजे मला शिक्षा वाटते एवढच कारण माझ्या उपहासाला पुरेसं आहे.

या चर्चेत अधिक लिहिण्याची माझी मुळीच इच्छा नाही.