या बाई या

बकुळीच्या झाडाखाली फुले वेचू या

ऊन पडले

पान फुल दिसे कसे गोडगोडुले

मला वाटले

मोतियाचे दाणे कुणी खाली पाडले

रान हलले

पहाटेला शुकदेव गाणे बोलले