ही रुबाई नाही.

रुबाईत साधारणपणे गंभीर विषय हाताळले जातात. चार ओळीत एक विचार पूर्ण करायचा असतो. खरे तर रुबाई बहरे-हज़ज ह्या वृत्तात किंवा त्याच्या २४ उपप्रकारातच लिहिली जाते.

मुख्य वृत्त असे- 
यमाचा गा, यमाचा  गा, यमाचा गा,  यमाचा गा.
मफ़ाईलुन, मफ़ाईलुन, मफ़ाईलुन, मफ़ाईलुन

मनोगतावर प्रकाशित कुठे आसावले कोणी कुणाच्या बासरीसाठी ही प्रवासींची गझल ह्याच वृत्तात आहे.

पण आजकाल इतर वृत्तेही रुबाईसाठी कविजन चालवून घेतात.

आम पापभिरू मुसलमानाच्या तोंडी असलेले 'लाहौल विला कुव्वत इल्ला बिल्ला' हे  वचन रुबाईच्या वृत्तात बसते. सैतानाचे नाव घेतल्यावर, किंवा वाईट गोष्टीचे, हराम गोष्टीचे नाव घेतल्यावर वरील वचन म्हणतात, असे आठवते. शुभ बोल, कुणाचे नाव घेतलेस असा अर्थ असू शकतो. जाणकार अधिक सांगू शकतील.

हे वचन असणारी रूबाई -
इन्सान समझता है के मैं भी कुछ हूं
नादान समझता है के मैं भी कुछ हूं
लाहौल विला कुव्वत इल्ला बिल्ला
शैतान समझता है के मैं भी कुछ हूं

 ताराप, यमाचा, मानावा, मानावा किंवा २२ मात्रांचे मात्रावृत्त म्हणता येईल. इतरही अनेक वृत्ते आहेत.

'ज़ौक़'ची एक आठवणारी रुबाई-

इस जहल का है 'ज़ौक़' ठिकाना कुछ भी

इक दानिश ने किया दिल को दान कुछ भी
हम जानते थे इल्मसे कुछ जानेंगे
जाना तो ये जाना के न जाना कुछ भी


जहल म्हणजे मूर्खपणा
इल्म, दानिश म्हणजे ज्ञान


पण तूर्तास एवढेच.
चित्तरंजन