टग्या,
तुमच्याशी शंभर टक्के सहमत आहे.
माझे स्वतःचे मत विचाराल तर तलतच्या मधाळ, मोरपंखी आवाजासमोर हजार हिमेश कुर्बान!
वुडहाऊसविषयीचाही तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. पु. लं. नी म्हटल्याप्रमाणे वुडहाऊस हा बालगंधर्वांप्रमाणे समग्र आवडण्याचा किंवा न आवडण्याचा विषय आहे. पण वुडहाऊसचे नावही ऐकलेले नसणे हे क्षम्य नाही असे मला वाटते. ( अर्थात हे फक्त आपल्याकडेच आहे असे नाही. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण मस्कतच्या ब्रिटिश काउन्सिल लायब्ररीच्या ब्रिटीश ग्रंथपालिकेला वुडहाऊस हा लेखक माहिती नव्हता - आणि हे ऐकून माझा तिळपापड झाल्यावर्ही त्या बिचारीला आपले काही चुकते आहे, असे वाटले नाही. आता बोला!)
असो.
सन्जोप राव