भारताची १/३ हून अधिक लोकसंख्या १५ वर्षांच्या खालील आहे (चु.भू.द्या. घ्या.). मुंबई बाँबस्फोटांनंतर जन्मलेली; माहितीजाल, अनेक वाहिन्यांची दूरचित्रवाणी, चलतध्वनी यंत्रणा, एसेमेस, या सगळ्या गोष्टी ग्रुहित धरणारी ही मंडळी. त्यांच्या आणि आपल्या अभिरुचीत फरक हा असणारच.

ज्याप्रमाणे माझ्या वडिलांना आवडणारी नलिनी जयवंत मला काकूबाई वाटे, आणि मला आवडणाऱ्या अभिनेत्री माझ्या पिलांना काकूबाई वाटतात, त्याचप्रमाणे सध्या पिलांना आवडणारी रानी मुखर्जी ही त्यांच्या पिलांना काकूबाई/आजी सारखी वाटणार आहेच. (हे शेवटचं वाक्य पिलांना सांगितलं होतं तेव्हा माझ्या भावना मनापासून कळल्याची समज मला त्यांच्या डोळ्यांत दिसली होती).

बाबा सैगल नामक बनियनधारी युवक आठवतो का? या हिमेश मध्ये काही दम नसेल तर तो बाबा सैगलसाखाच नष्ट होईल (हे जाणूनच कदाचित "महिन्याला एक" चा रेटा चालवत असेल त्याने). नाहीतर आर. डी., रहमान सारखा तगेल.

- कोंबडी