'ला हौल ला कुव्वत'(रोमनमध्ये)वर गूगलसर्च मारला असता त्यातून जे निष्पन्न झाले, त्यावरून मूळ अरबी वचन हे "ला हौल व ला कुव्वत इल्ला ब'इल्लाही" असे काहीसे असून, त्याचा अर्थ (इंग्रजीत, १०%च्या नियमामुळे देवनागरीत) "देअर इज नो पॉवर नॉर स्ट्रेंग्थ बट इन गॉड" असा होतो, असे कळते. "ऍन एक्स्क्लमेशन यूज्ड बाय मुसलमान्स् इन केसिस ऑफ सडन सर्प्राईज, मिस्फॉर्च्यून, एट् सेटेरा" असाही एक संदर्भ त्यांपैकीच एका ठिकाणी मिळतो.
अर्थात यापैकी कोणत्याच बाबतीत काहीही गम्य नसल्याने, जे सापडले ते आहे तसेच दिले आहे; कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्याचा (अथवा भाषांतर करण्याचासुद्धा) प्रयत्न केलेला नाही. केवळ रोमन अक्षरमर्यादेमुळे देवनागरीत लिप्यंतरण केलेले आहे. तज्ज्ञांनी योग्य तो खुलासा करावाच.
- टग्या.