जुन्या नव्याचा संघर्ष चालणार हे खरे आहे. पण असले भयाण संगीत लोकप्रिय होऊ नये अशी तळमळ असेल तर कुवतीनुसार कष्ट, पैसा, वेळ वापरुन जुने संगीत लोकप्रिय केले पाहिजे. आपापल्या गटात (मराठी मंडळ, गणेशोत्सव) जुन्या गाण्यांवर आधारित स्पर्धा ठेवणे जसे गायन, क्विझ वगैरे आणि भक्कम बक्षिसेही ठेवणे म्हणजे लोक उत्साहाने भाग घेतील. सध्या भारतातून अमेरिकेत वरचेवर हिंदी चित्रपट कलावंत येईल काही(च्या)बाही कार्यक्रम करतात. तसे जुन्या गाण्यांवर आधारित करण्याकरता आर्थिक पाठबळ दिले तर जुनी गाणी म्हणणारेही येतील.
बडे उद्योजक असाल तर टिव्हीवर जुन्या गाण्यांवर आधारित कार्यक्रमांना जाहिराती उपलब्ध करुन देणे असले करता येईल.
जुन्या गाण्यांची, चित्रपटांच्या व्हिसीड्या वा डिव्हिड्या बनवल्या जातील याकरता विविध निर्मात्यांशी संपर्क साधणे हेही कदाचित काहीतरी साध्य करुन देईल.
एक गोष्ट खरी की आजकालची रिमिक्स, अन्य सिनेमे हे सहकुटुंब बघताना अनेकदा संकोचायला होते. डिव्हिडीचा रिमोट हातात भक्कम धरलेला असावा लागतो. पूर्वीच्या सिनेमात हे इतके होत नसे.