हिमेश शेवटी 'लोकप्रिय' संगीताचे प्रतिनिधित्व करतो. तिथे जे विकले जाते आणि कमी श्रमात जमते तेच जास्त संख्येने तयार होणार. त्याच्याही आधी अनु मलिक आणि मंडळी हो्तीच की.
मला व्यक्तीश: त्याने गायलेली / 'रचलेली' काही गाणी ऐकायला आवडतात - भलेही मी जरी अभिजात / जुने संगीत खूप आवडीने ऐकत असलो तरी.
बाकी उचलेगिरी (किंवा 'प्रेरणा घेणे') हे तर फार जुने आहे - अगदी स्व. नौशाद यांच्यावरही बंदिशी उचलल्याचे आरोप आहेत . पुर्वी माहितीची देवाणघेवाण इतकी सोपी नव्हती म्हणून फारसे कळायचे नाही इतकेच. हा दुवा बघा -