आपल्याशी सहमत आहे.

आपण सर्व मुलांच्या शिक्षणासाठी पहिल्यापासूनच पोषक वातावरण  निर्माण करू शकलो तर त्यांच्यात निकोप स्पर्धा होऊ शकेल. अशी उदाहरणे आपण मोठ्या शहरात पाहत असतोच. अशा वेळी कसलीही दुफळी माजण्याचे काही कारण नसेल. आणि कादचित आरक्षणाची गरजही नसेल.
आरक्षणामागची तत्त्वे योग्यच आहेत, पण त्यांचा उपयोग सध्या फक्त राजकीय आणि वैयक्तिक स्वार्थासाठी केला जातोय (कुठल्याही पक्षाचा अपवाद नाही) हे सर्वमान्य असावे. (नाहीतर आज एका तरी पक्षाने आरक्षण विरोधात केलेल्या उपोषणाचा बळी ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे  भांडवल करायला कमी केले नसते- पण अशा किती लोकांची मते मिळणार हो!, असो)