हिमेशला नावे ठेवल्यावर आपल्या नाकाला इतक्या मिरच्या झोंबल्या या अर्थी आपण त्याचे जबरदस्त चाहते दिसता. चांगली गोष्ट आहे, आपले अभिनंदन.
असो, आता आपल्या प्रत्येक मुद्द्याचा व्यवस्थित समाचार घेतो.
शीर्षक - नाही आवडत तर द्यावं की सोडून.
अहो, कसं देऊ सोडून? हा प्राणी जिथे तिथे भेटतो. घरी रेडिओवर, टीव्ही सुरू केला की तिथे,कार्यालयात, रस्त्यावर ध्वनिक्षेपकांतून, सगळीकडे. जिकडे तिकडे तोच आहे, कसा सोडून द्यायचा त्याला?आम्ही त्याच्या मागे जात नसलो तरी तोच आमच्या मागे येतोय, काय करावे आम्ही,आपण जरा मार्गदर्शन करता का?
लाखो लोकांच्या मनात घर करून बसलेल्या व्य्क्तीला शिव्या कशापाय देताय?
होहोहो, हिमेश लाखो लोकांच्या मनात घर करून बसलाय ही माहिती आम्हाला तर नविनच आहे हो! ह्या माहितीसाठी धन्यवाद. आम्हाला तर वाटत होतं की हा मान आत्तापर्यंत लोकांनी फक्त लता, आशा, मोहम्मद रफी नि आरडी यांनाच दिलाय.
आशुतोशराव, तुम्ही गायला लागलात तर तुमच्या घरचे लोक तरी ऐकतिल का?
अहो, 'हिमेशने उच्छाद मांडलाय' ही चर्चा सुरू करायला आशुतोशरावांना गाणे कशाला यायला हवे? असे म्हटले तर मग आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात घडणाऱ्या गोष्टींवरच मतप्रदर्शन करावे लागेल. आता मी संगणकप्रणाली विकसन क्षेत्रात आहे, मग मी फक्त त्याच क्षेत्राबद्दल बोलतो. मग असं करू, प्रत्येक मनोगतीचे व्यवसायक्षेत्र जाणून घेऊ, नि त्याने फक्त त्याच क्षेत्राबद्दल बोलावे असा नियम करू, काय? म्हणजे मंत्र्यांनी घोटाळे केले नि आम्ही ओरडलो की तुम्ही लिहा' तुम्हाला एक नगरपालिका तरी नीट सांभाळता येईल का? ' किंवा आपल्या भारतीय क्रिकेट संघाने एखादा सामना अपमानस्पद रितीने हारल्यावर जर आम्ही काही बोललो की तुम्ही म्हणा 'तुम्हाला बॅट तरी हातात धरता येते का?' बरोबर ना हो?
"आप का सुरूर" ची विक्री काय झाली ठाऊक आहे का तुम्हाला?
अरेरे, मला तर वाटले होते की एखाद्या कलाकाराच्या कलेवरूनच त्याची उच्चनीचता ठरवली जाते,माफ करा हं, मी चुकलो ! आता हिमेशच्या गाण्यांची विक्री सगळ्यात जास्त म्हणून तो मोठा, म्हणजे बाकीचे सगळे कलाकार सामान्यच ठरले की हो.
ज्या लोकांनी त्यांना ऐकलेले नाही ते लोक चर्चा करतात.
मला वाटतं या मुद्द्याचं स्पष्टीकरण मी वरच दिलंय. जिथे तिथे हा प्राणी ऐकू येतो, सगळ्यांनी त्याची गाणी (नाईलाजाने का होईना) ऐकली आहेत, म्हणूनच त्यांनी यावर प्रतिसाद दिलाय.
हे सर्व आधी ऐका मग पिंका टाका.
माफ करा, पण मला वाटतं या चर्चेत पिंक टाकण्याचं काम आपणच करता आहात. काय म्हणता?
एक वात्रट