कोंबडीताई, आपली चर्चा वाचली, खरोखरंच सुंदर आहे. अशी चर्चा सुरू केल्याबद्दल आपले आभार.
खरंतर बहुतेक मुद्द्यांबाबत माझी मते स्पष्ट असतात(योग्यच किंवा मुळीच बदलली न जाणारी असं नाही म्हणत मी ! गैरसमज नको !) पण या चर्चेत आपले नि इतरांचे विचार वाचून मी खरंच गोंधळून गेलोय.मला वाटतं की कुठल्याही गोष्टीचा अभिमान असणं ही माणसाची एक स्वाभाविक प्रवृत्ती आहे, त्याची एक गरजच आहे म्हणाना ! यामुळेच तो जगत असतो, आयुष्यात काहीतरी करू शकतो. ज्या व्यक्तीला कुठल्याच गोष्टीचा अभिमान नाही अशी व्यक्ती अस्तित्वातच असणं शक्य नाही असं मला तरी वाटतं.
असो, एकंदरीत या मुद्द्यावर मला बराच विचार केला पाहिजे असं दिसतंय !
एक वात्रट