अवांतरः महाराष्ट्रा सोबतच अभियांत्रिकी क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या तामिळनाडू, कर्नाटक मध्ये एकूण आरक्षण ५०% हून अधिक आहे. बिहार वा उत्तरेतील इतर राज्यांत असे आरक्षण नाही असे वाटते.
खर तर शिकण्याची प्रबळ ईच्छा असलेला कितीही गरिब परिस्थितीशी झगडुन वर येवु शकतो मग तो कोणत्याही जातीमधला असो.
हे स्वर्णांनाची लागू पडते. (पण हेच विधान पुढे येणाऱ्या आमाव* संबंधीत आरक्षणाशी विसंगत नाही?)
मागासातुन वर आलेल्यांची ईच्छा ही उच्चवर्णियांत प्रवेश मिळवायची असते.
यात काय अडचण आहे? अशी इच्छा असू नये का? की हेच या विरोधाचे मूळ आहे?
तुमच्या बरोबर आमच्या जातितल्या गरिबांचे भले का नको?
आपल्याच सवर्णातील आर्थिक दृष्या मागास बांधवांना मुक्त जागांमधील (५०%) अर्ध्या जागा (२५%) देण्याची आपली तयारी आहे? (लक्षात घ्या इथेही तुमची शेवटची जागा हातची जाणे वगैरे बाबी लागू होतील!)
विरोध नक्की का?
१. याने या संस्थांची गुणवत्ता ढासळेल.
२. देशात फूट पडेल.
३. आर्थिक प्रगती खुंटेल.
४. जागतिक बाजारपेठेत आपण तोंड दाखवू शकणार नाही.
१. माझ्या मुलाला/मुलीला प्रवेश मिळणे कठीण जाईल.
२. परदेशी शिक्षण (माझी) सध्यपरिस्थिती पाहता परवडण्यासारखे नाही.
३. अहो, असला टॅग नसेल तर खऱ्या गुणवंताला विचारतंय कोण?
४. या महाविद्यालयांत फार छान सोयी असतात, बाहेर नसतात. मी स्वतः अनुभवलंय म्हणून सांगतो.
५. बाहेरच्या महाविद्यालया कॅंपस नाही हो चांगला. नावालाही एमएनसी नाही.
६. देशसेवा करायला पीएसयूज आहेत ढिगाने. प्रवेश परीक्षा द्या, पदवी दाखवा की चला पुढे. पण ते हवंय कुणाला. तिथं फार भ्रष्टाचार हो! न्यूझीलंड मध्ये बघा भ्रष्टाचार जवळ जवळ नाहीच! (सापही नाहीत म्हणे पण तो भाग वेगळा.)
१. या संस्थात शिकला नाही तर माझा मुलगा अभियंता होऊच शकणार नाही.
२. या संस्थात दिले जाणारे ज्ञान अत्यंत गुप्त असून ते बाहेर उपलब्ध होणे निव्वळ अशक्य आहे. इथली पुस्तकेही अद्वितीय आहेत.
३. आरक्षणामुळे सर्वात गुणवंत मुलाचे नुकसान होते. यादी मधील शेवटच्या न्हवे.
४. भारत सरकारने शिकण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येकाला उच्चशिक्षण देणे गरजेचे आहे. ते करण्यासाठी सरकार कडे पुरेसे पैसे देखील आहेल. (आखातात काहीच कर नाहीत म्हण! मस्तच ना! युरोप मध्ये कर असतील जास्त पण निदान सरकार सोयी तर पुरवते ना!)
... सुचेल तसे आणखी काही.
अवांतर - उच्चशिक्षण हा मुलभूत अधिकार आहे?
प्रवेश मुकणे
१. आरक्षण आहे याची पूर्वकल्पना असताना, ज्या आरक्षणातील जागा आपणास कधीच मिळणार नाहीतच याची देखील पूर्वकल्पना असताना २. खुल्या प्रवर्गासाठी लागणाऱ्या गुणांची पूर्वकल्पना असताना, त्याच गुणांसाठी प्रयत्नपूर्वक (ऐपतीप्रमाणे खाजगी शिकवण्या लावून वा न लावता) झटूनदेखील न मिळालेला प्रवेश म्हणजे प्रवेश हुकणे होते का?
जी संधी तुमची नव्हती (ज्याची तुम्हाला पूर्वकल्पना देखील होती) ती संधी तुम्हाला हुलकावणी देऊ शकते? की 'शिक्षणव्यवस्थेतिल जागा अपूऱ्या असणे' इतकाच याचा मर्यादित अर्थ आहे?