मूळ प्रस्तावात खालील मजकूर आहेः

२. उपक्रम शक्यतो "देशसेवा"/"समाजसेवा" अशा कप्प्यांत बसणारा असावा (म्हणजे "ग्रंथचर्चा"/"नाट्यरजनी"/"पक्षीनिरीक्षण शिबीर आयोजन" वगैरे नको ). याउप्पर तुम्ही तुमच्या व्याख्या वापरा.

मला वाटते की दुसऱ्याने असा कोणताही निकष लावणे योग्य होणार नाही. तुम्हाला ग्रंथचर्चा=अभिरुची संपन्न वाचक=देशसेवा, किंवा पक्षीनिरीक्षण=पर्यावरण आवड=पर्यावरण बचाव=देशसेवा असं वाटत असू शकेल. देशसेवेच्या तुमच्या व्याख्येत तुमची कृती बसली, म्हणजे झालं.

- कोंबडी