त्याच्या प्रतिसादाला उत्तर पुन्हा एकदा

१. आरक्षण आहे याची पूर्वकल्पना असताना, ज्या आरक्षणातील जागा आपणास कधीच मिळणार नाहीतच याची देखील पूर्वकल्पना असताना

अशी पुर्वकल्पना कोणालाच नसते. प्रत्येकालाच प्रयत्न करायचा असतो. आणि म्हणुन आशा सुद्धा असते. पुर्वकल्पनेला महत्व द्यायचे असेल तर प्रयत्न सोडुन द्यावा लागेल

खुल्या प्रवर्गात ८५% ल्या प्रवेश मिळणार नसेल आणि आरक्षणातल्या जागेवर ५५% ला प्रवेश मिळणार असेल तर ८५% मिळवणाऱ्या मुलाचा "प्रवेश मुकला" असेच म्हटले पाहिजे.

महाराष्ट्रात गेली काही वर्षे इमाव* साठी आरक्षण आहे. अभियांत्रिकी मध्ये देखील. महाराष्ट्रात नक्की कशी फूट पडली? अर्थातच आरक्षण असावे की नसावे या मुद्यावरील सोडून.

फूट पडणे म्हणजे एकमेकांचा द्वेष करणे असेल तर फूट कधीच पडली आहे.

विरोध नक्की का?

१. याने या संस्थांची गुणवत्ता ढासळेल.
२. देशात फूट पडेल.
३. आर्थिक प्रगती खुंटेल.
४. जागतिक बाजारपेठेत आपण तोंड दाखवू शकणार नाही.

सहमत

बाकीच्या उपहासात्मक कारणांशी असहमत.

उच्चशिक्षण हा मुलभूत अधिकार आहे?

नसेल. परंतु सरकारच्या कर्तव्यापैकी जरुर आहे.

- सूर्य