१. कितीही लहान प्रमाणावर असला तरीही तुमचा स्वतःचा सहभाग किती आणि काय हे सांगायचं आहे.

अमेरिकेतून भारतात विविध प्रकारची मदत पाठवणाऱ्या संघटनेला वेळोवेळी देणगी देतो.

विद्यापीठातली भारतीय विद्यार्थ्यांची संघटना भारताचे, भारतीय संस्कृतीचे/समाजाचे काय रूप जगासमोर मांडते यावर वेळोवेळी योग्य माणसांकडे टीका किंवा कौतुक करतो.

ज्या संभाषणात भारतीयेतर सहभागी असतात तेंव्हा कोणी भारताबद्दलचे अज्ञान/गैरसमज प्रकट केला तर माझ्या परीने ते दूर करण्याचा प्रयत्न करतो. तेंव्हा आम्ही १०५ अशी भूमिका असते.

उदा० क्र.१
मो.क.गांधीच्या आचार/विचारांशी माझे कितीही मतभेद असले तरी त्यांच्या आचार-विचारांची सकारात्मक मांडणी करतो.

उदा० क्र.२
अमेरिकेच्या काही तटरक्षक दलाच्या जवानांशी बोलण्याची वेळ आली. अर्थातच भारत-पाकिस्तान मुद्दा निघाला. सदर जवानांना मुशर्रफ हा एक अतिशय सज्जन-साधा-शांतिदूत मनुष्य आहे असा समज करून देण्यात आल्याचे कळले. भावनातिरेक होऊ न देता त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.

उदा० क्र.३
परदेशात विशेषतः भारतात एका ख्रिश्चन मिशनवर जाण्याची इच्छा एका जवळच्या गोऱ्या अमेरिकी मैत्रिणीने बोलून दाखवली तेंव्हा तिला मिशनवाले धर्मांतरे करण्यासाठी अन्नछत्रे आणि इस्पितळे काढतात हे समजावून सांगितले. (धर्मांतरे करतात हे ऐकून तिने मिशनवर जाण्याचा विचार सोडून दिला.)

याला देशसेवा म्हणणे म्हणजे अनेक थोर देशभक्तांच्या देशसेवेचा अपमान होईल असे वाटते. पण हा माझा खारीचा वाटा आहे असे वाटते.

४. तुमच्या मनात घोळत/शिजत असलेल्या नव्या कल्पना मांडायला हरकत नाही.

भारतातून इथे येऊन शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या एखाद्या गुणवंत-प्रज्ञावंत पण आर्थिक पाठबळ नसलेल्या विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला संपूर्ण आर्थिक मदत देण्याचा विचार मनात घोळत आहे. (अशी मदत द्यायला अर्थात आणखी काही वर्षे वेळ आहे! आडात असेल तरच या पोहऱ्यात येणार ना!)