'कोंबडी' यानी खरोखरच आत्मपरीक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्याना धन्यवाद!देशसेवा,समाजसेवा या सदरात मोडेल असे काहीतरी हातून घडावे अशी इच्छा तर आहे पण हातून घडत तर काही नाही अशी खन्त तरी व्यक्त करण्यास ही संधी त्यानी दिल्याबद्दल त्यांचे आभार.थोडीबहुत समाजसेवा म्हणता येईल अशा एकदोन कामांचा उल्लेख करावा वाटतो.माझ्या जन्मग्रामाच्या शाळेला देणगी ,CRY  ला प्रत्येक वर्षी २ बालकांच्या पालनायेवढ्या रकमेची देणगी, शिवाजी विद्यापीठान्तर्गत संस्कृत भाषा शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य. पुण्यातील आमच्या गृहसंकुलात ज्येष्ठ नागरिक संघ स्थापण्यात पुढाकार इ.तरीही अगदीच दुऱ्ऱ्या तिऱ्ऱ्यांची ही उतारी आहे याची मला जाणीव आहे.