पुलंची अफाट निरीक्षणशक्ती! कोणत्याही माणसाच्या वागण्या-बोलण्याचे बारकाव्यासह निरीक्षण हे या पुस्तकाचे बलस्थान आहे असे वाटते. कोणत्याही माणसाचे निरीक्षण करून त्या 'व्यक्ती'बद्दल आपुलकी वाटायला लावणारे साधे-सरळ-सहज विनोदी लेखन सर्वांना जमतेच असे नाही. या पुस्तकातल्या कोणत्याही 'वल्ली'बद्दल तिरस्कार किंवा घृणा अजिबात वाटत नाही.

माणसांचे सखोल निरीक्षण करण्याचे धडे आर्थर कॉनन डायल यांच्या 'शेरलॉक होम्स'च्या बरोबरीने पुलंच्या या पुस्तकाने दिले असे म्हणणे वावगे ठरू नये.