माणसं आणि मानसं, मती आणि माती यांची इंग्रजी रूपे सारखीच दिसतात. मनोगतचे नाव ठरवताना प्रशासकांनी हा एक मुद्दा सांगितला होता की संकेतस्थळाचे नाव इंग्रजीत लिहिले जाणार browser मधे, म्हणून त्यांनी हे नाव निवडले. म्हणजे वेगळा काही उच्चार व्हायला नको.
एकाच इंग्रजी spelling ने किती वेगळे शब्द (मती व माती) तयार होतात, ही गंमत दाखवण्यासाठी, पर्यायाने आपली भाषा आपल्या लिपीत लिहिण्यासाठी सगळ्यांना उद्युक्त करण्यासाठी प्रशासकांनी जाणून बुजून हे लिहिले असावे असा माझा कयास आहे.