बाकी प्रत्येकाने आपले काम 'प्रामाणिकपणे' करणे, अप्रामाणिकपणाचा सोपा, धोपटमार्ग टाळण्याचे धाडस दाखवणे ही देखील मोठी देशसेवा ठरेल असे वाटते.
पूर्णतः सहमत.
साध्या २ रुपयांसाठी भाजीवालीशी ५-१० रुपयांसाठी रिक्षावाल्याबरोबर भांडणारा भारतीय फसवणूक करणाऱ्या कंपन्याच्या (टेलिकॉम सेवादाते इत्यादींच्या) मुजोरी कडे दुर्लक्ष करतो असे दिसते. त्याने याचा सोयीस्कर अर्थ घेत, जर विक्रेता आपणास जाणून बुजून फसवत नाही, वा गैरफायदा घेत नाही असे वाटल्यास किंवा विक्रेता गरजू आहे असे भासल्यास घासाघीस न करण्याचा निर्णय घेतला.
या उलट मोठ्या खरेदाऱ्या करताना, वा मोठ्या संस्थांशी व्यवहार करताना शक्य तितके कौशल्य पणाला लावून, माहिती जमा करून वस्तू योग्य भावालाच घेतली जात आहे नि आपण लुबाडले जाणार नाही याची खातरजमा करण्यास प्रारंभ केला.
मीही असेच करतो. अर्थात 'त्याच्या'इतके कौशल्य संपादन केले आहे का? हा अनुत्तरित प्रश्न आहे.