बेरीज
- ओबीसींना २७% आरक्षण मिळणार.
- तितक्याच जागा सरकार वाढवणार, त्यामूळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही.
वजाबाकी
- राष्ट्रीय ज्ञान आयोगाच्या २ सदस्यांचे राजीनामे.
- त्या आयोगावर अर्जुनसिंग, सीताराम येचुरी आदी लोकांनी आपापल्या कुवतीप्रमाणे केलेली धुळवड
- नविन जागा वाढवण्यासाठी लागणारा ८००० कोटींचा खर्च, त्या खर्चाचे भागीदार 'समाजसेवक' आणि'त्यागाचे बळी' म्हणजे आपले टॅक्स-पेयर्स.
- आंदोलकांनी पोलिसांचा खाल्लेला मार, उपोषण, ताण-तणाव.
- आणि या नाट्याची शोकांतिका म्हणजे "दुभंगलेली मने!!!" ....ही कशी सावरणार?
हा कोणाचा विजय की कोणाचा पराभव?
काही अनुत्तरीत प्रश्नः
असा निर्णय 'परस्पर' जाहीर करण्यापूर्वी अशा संवेदनशील बाबींसाठी मंत्र्यांना थोडे नीट नियोजन करता आले असते का?
जाता जाता एक टपलीः मेडिया आणि सर्वसामान्य लोकांच्या (विशेषतः विद्यार्थ्यांच्या)जागरुकतेमूळे आजकाल असा 'परसनल अजेंडा' 'आणीबाणी' प्रमाणे थोपवता येत नाही, हे या प्रकाराने सिद्ध झाले, हे एक बरेच झाले असे म्हणावे लागेल! हे ह घ्या! :)