वृकोदरांशी संपूर्ण सहमत.

वंदनचे दोन अर्थ होतात असे वाटते -
१. एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला श्रेष्ठ मानून त्याच्यापुढे झुकणे
२. एखाद्या व्यक्तीची किंवा वस्तूची पूजा करणे किंवा तिला पूजनीय मानणे (हा अर्थ सूचित होतो)
या दोन्हीमुळे अल्लाह (ईश्वर) च्या सर्वंकष सत्तेत किंवा महत्तेत अन्य कोणीतरी भागीदार (शरीक़) बनविला जातो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर (ईश्वराला सोडून) अन्य कोणीतरीसुद्धा वंदनाला पात्र आहे असा विचार व्यक्त होतो. याला शिर्क़त म्हणतात व हे इस्लामच्या दृष्टीने महापाप व धर्मद्रोह आहे. हे कोणीही सच्चा मुस्लिम करू धजेल असे वाटत नाही.
पण असे असले तरीही, यातून तांत्रिक पळवाटा काढता येतात असे सत्त्ताधारी किंवा संत यांच्या बाबतच्या मुसलमानांच्या व्यवहारातल्या वर्तनावरून दिसते. इस्लाम हा अत्यंत कडक व तर्ककर्कश धर्म असल्याने असा कीस काढल्याशिवाय मुसलमानांना जगणेच कठीण होईल.  
तर अशीच काहीतरी तांत्रिक पळवाट वंदे मातरम विषयी रीतसर मुस्लिम धर्मगुरूंनीच आधीपासून काढून दिली असती तर एवढा विरोध कदाचित त्याला झाला नसता. पण आरंभापासून त्याचे राजकारण करून बट्ट्याबोळच करायचा झाला हे आपले सर्व भारतीयांचे दुर्दैव.