पंडित नेहरू एकदा मागास वर्गियांच्या एका जाहीर सभेला गेले होते. नेहमी प्रमाणेच त्यानी आपण "सारे बंधू आहोत,देवाची लेकरे आहोत...." वगैरे मुद्दे सुरू केले असता, त्या चळवळीचे त्याकाळचे एक विशिष्ट नेता (नक्की नाव आठवत नाही, सापडताच दिले जाईल.) ताडकन उठून म्हणाले, "भाऊच ना? मग आम्ही जी कामं करतो, ती करायलाही का हातभार लावत नाही तुम्ही?" पंडीतजीं निशब्द झालेले पाहताच, व्यासपीठावरून उतरत तो नेता ती सभा तशीच सोडून निघून गेला.