माझा कुठल्याही प्रकारच्या आरक्षणाला विरोध आहे. कारण एखादा अधिक धनवान आहे; तर त्याची शिक्षा त्याच्या मुलाला का द्या?
उदा.
समजा आज "अ" आणी "ब" या व्यक्ती आज एकाच आर्थिक स्तरावर (आर्थिक मागासवर्गीय) आहेत.
"अ"ने झटून , कष्ट घेऊन अभ्यास केला (हाच एक मार्ग अस्मादिकास ठाऊक आहे), पदव्या संपादन केल्या आणी धन मिळविले आणी याउलट "ब' मात्र तितका यशस्वी होऊ शकला नाही आणी त्याचा आर्थिक स्तर बदलला नाही.
तर पुढे जेव्हा "अ" आणी "ब" ना मुले होतील; तेंव्हा "ब" च्या मुलांना का बरे आरक्षण मिळावे? "अ'ने आणी "अ" च्या मुलांनी असा काय गुन्हा केला?
त्यामुळे कुठलेही आरक्षण असू नये असे माझे मत आहे.
त्यापेक्षा भोमेकाकांनी सुचवलेला उपाय योग्य आहे.
(आरक्षण विरोधी),
'असा'-मी