धनवान व कर्तुत्ववान पालकांच्या मुलांवरच टाच का हा प्रश्न खरोखर विचार करण्यासारखा आहे. ज्या पालकांनी आपल्या कुटुंबासाठी श्रम करुन धन मिळवले त्यांच्या मुलांनी श्रम करुन विविध प्रवेश परीक्षा उ‍त्तीर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला त्यांना आणखी कर्तुत्व दाखवण्याची संधी न देणे योग्य नव्हे. शिक्षणाच्या समान संधी गावापासून शहरापर्यंत सर्व स्तरावर उपलब्ध करुन देण्यात सरकार अयशस्वी ठरले आहे. त्यामुळे हा विवाद निर्माण झाला आहे. यापेक्षा सरकारने जागा वाढवून तर दिल्या पाहिजेतच शिवाय उच्च शिक्षणावर होणारा खर्चही कमी होईल हे पाहिले पाहिजे. ज्या योगे सर्व आर्थिक स्तरातल्या नागरीकांना त्यात प्रवेश मिळवणे शक्य होईल आणि आरक्षण न देता ज्यांच्या अंगात खरोखर क्षमता आहे त्यांना शिष्यवृत्ती द्या मग त्याचा आर्थिक स्तर कोणताही असो.