इथे छायताईंना दुभत्या व्यवसायातच 'गुणवत्ता धारकांची अनुपस्थिती खटकते' पण या इतर क्षेत्रात, ज्यात सवर्ण कित्येत शतके नव्हते, त्यात त्यांना आपल्या गुणवत्तेवर प्रवेश करावा वाटत नाही. कमी दर्जाच्या जागांत आरक्षण मागावे असेही वाटत नाही किंवा मागासांसाठी असलेल्या अशा कनिष्ठ वर्गातील कामांतील आरक्षणाचा निषेध ही करावा वाटत नाही. उच्च शिक्षण इत्यादी मात्र आपलीच सद्दी असल्याच्या भावनेने आरक्षण खटकते. या कडे लक्ष वेधायचे आहे असे वाटते.
अशा क्षेत्रातही सवर्णांचे प्रमाण पुरेसे आहे की नाही, हे पाहता तेथील आरक्षणाबद्दलही विरोधा केला जावा असे वाटते.
उच्चशिक्षण हा जसा उच्चवर्णियांचा हक्क नाही, तसाच हलक्या प्रतीची कामे करणे हा ही मागास जातींचा असू नये याबद्दल तर इथे एकमत होऊ नये काय?
(अवांतर केवळ प्रतिष्ठेला धक्का म्हणून अशी हलक्या प्रतीची कार्यालयीन कामे करता येत नाहीत व इतर कामे मिळवायची पात्रता उरली नाही अशी एका सवर्णाची खंत वाचल्याचे स्मरते.)