ज्यात सवर्ण कित्येत शतके नव्हते, त्यात त्यांना आपल्या गुणवत्तेवर प्रवेश करावा वाटत नाही.
कोणाला काय काम करावेसे वाटते हा व्यक्तिगत प्रश्न आहे. सगळे सवर्ण मिळुन असे ठरवत नाहीत की अमुक एक व्यवसाय करावा.
कमी दर्जाच्या जागांत आरक्षण मागावे असेही वाटत नाही
ज्या कामाचा दर्जा सो कॉल्ड कमी आहे ते काम तुम्ही तरी आपणहुन (आयुष्यभर) कराल काय असा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो.
उच्च शिक्षण इत्यादी मात्र आपलीच सद्दी असल्याच्या भावनेने आरक्षण खटकते.
उच्च शिक्षण हे गुणवत्तेवर अवलंबुन असावे असे वाटते आहे याचा अर्थ ती कोणा एका वर्गाची सद्दी आहे असा नाही.
(अवांतर केवळ प्रतिष्ठेला धक्का म्हणून अशी हलक्या प्रतीची कार्यालयीन कामे करता येत नाहीत व इतर कामे मिळवायची पात्रता उरली नाही अशी एका सवर्णाची खंत वाचल्याचे स्मरते.)
वा !! एका सवर्णावरुन सगळ्यांसाठी निष्कर्ष पद्धत चांगली आहे.